Rudra सोलर कुकर उर्फ सौरचूल
सोलर कुकर उर्फ सौरचूल
सूर्यप्रकाशावर चालणार्या सौरचूल ह्या साधनाचा वापर करून अन्न शिजवता येते
फायदे
>> अन्न शिजवण्यासाठी गॅस, रॉकेल, कोळसे, वीज अथवा लाकडे जाळण्याची मुळीच गरज नाही.
>> सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
>> सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण 10-20% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी तर अ जीवनसत्व टिकण्याचे प्रमाण 5-10% अधिक असते.
>> सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते.
>> सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळे, आपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता.
>> सौरचूल वापरून आपण भाजणे, शिजवणे इ. सारख्या सर्व आवश्यक गोष्टी करू शकता.
तोटे
>> पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते.
>> अन्न शिजवण्याच्या नेहमीच्या पद्धतींच्या तुलनेमध्ये सौरचुलीतील अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो
सौरचुलींचे प्रकार
घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी: पेटी म्हणजेच बॉक्स प्रकारची चूल
ही एक साधी पेटी असते जी गरम होऊन आतील अन्न शिजते. सौरचुलीचा घरगुती पातळीवर वापरला जाणारा हा अगदी सर्वसामान्य प्रकार आहे.
सौरचुलीचे महत्वाचे भाग
बाहेरील पेटी : ही साधारणपणे जीआय प्रकारचे लोखंड, अॅल्युमिनियम किंवा फायबर रीएन्फोर्स्ड् प्लास्टिकपासून बनवतात.
अन्न शिजवण्यासाठीची आतील पेटी (ट्रे) : ही अॅल्युमिनियमची असते. ही आकाराने बाहेरील पेटीपेक्षा किंचित लहान असते व तिला काळा रंग दिलेला असल्याने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन अन्न ठेवलेल्या भांड्यांपर्यंत पोहोचवते.
काचेचे दुहेरी झाकण : आतील ट्रेवर बसणारे हे झाकण त्या पेटीपेक्षा किंचित मोठे असते. दोन काचांमध्ये 2 सेंटिमीटर अंतर असते व त्या अॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये बसवलेल्या असतात. ह्या दोन काचांमधील हवेमुळे आतील उष्णता बाहेर येऊ शकत नाही. फ्रेमच्या कडांवर बसवलेल्या रबरी पट्टीमुळे उष्णता तेथूनदेखील बाहेर निसटू शकत नाही.
उष्णतारोधक : आतील ट्रे व बाहेरची पेटी ह्यांमधली जागा ग्लासवूलसारख्या उष्णतारोधक पदार्थाने भरतात. पेटीच्या तळाकडूनही हा उष्णतारोधक पदार्थ लावलेला असल्याने उष्णता कोठूनही बाहेर पडू शकत नाही. ह्या पदार्थास चटकन पेटणार्या वस्तूंपासून दूर ठेवा.
आरसा : सौरचुलीतील आरशामुळे तेवढ्याच जागेमध्ये जास्त सूर्यकिरण शोषून घेणे शक्य होते. पेटीच्या मुख्य झाकणाच्या आतील बाजूने हा आरसा लावलेला असतो. आरशावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन काचेच्या झाकणामधून पेटीत पडतात. शिवाय पेटीला थेट सूर्यप्रकाश मिळत असतोच. अशारीतीने चुलीच्या आतले तापमान वाढून अन्न त्वरेने शिजण्यास मदत होते.
भांडी : झाकण असलेली ही भांडी साधारणतः अॅल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलची बनवलेली असतात. त्यांना बाहेरून काळा रंग दिलेला असल्यामुळे तीदेखील भरपूर सूर्यप्रकाश थेटपणे शोषून घेतात.
सौरचुलीचा वापर करून अन्न कसे शिजवतात?
>> मोकळ्या, सावली नसलेल्या जागेवर सौरचूल सूर्यप्रकाशात ठेवा. ह्या चुलीमध्ये अन्नाची भांडी ठेवण्यापूर्वी ही चूल किमान 45 मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवा म्हणजे ती अगोदरच गरम होऊन अन्न शिजण्यास कमी वेळ लागेल.
>> चूल अशा स्थितीत ठेवा ज्यायोगे सूर्यकिरण आरशावरून परावर्तित होऊन ते काचेच्या झाकणावर पडतील.
>> सौरचुलीचे झाकण उघडून भांडी आत ठेवा आणि झाकण बंद करा. एकदा ही भांडी आत ठेवल्यानंतर मध्येच झाकण उघडू नका.
>> अन्न शिजल्यानंतरच झाकण उघडा. आतील भांडी खूप तापलेली असतात, कपड्यामध्ये धरून ती बाहेर काढा नाहीतर बोटे भाजतील.
किंमत
चुलीचे मॉडेल व आकारानुसार तिची किंमत रु. 2500 ते रु. 4000 असू शकते
Contact for buying and dealership of solar cookers:
Rudra Solar Energy
sales@rudrasolarenergy.com
www.rudrasolarenergy.com
सौर चूल घ्यायची आहे, Cont.- 8007725980
ReplyDeleteBox Type
ReplyDelete