Rudra सोलर कुकर उर्फ सौरचूल
सोलर कुकर उर्फ सौरचूल सूर्यप्रकाशावर चालणार्या सौरचूल ह्या साधनाचा वापर करून अन्न शिजवता येते फायदे >> अन्न शिजवण्यासाठी गॅस, रॉकेल, कोळसे, वीज अथवा लाकडे जाळण्याची मुळीच गरज नाही. >> सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. >> सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण 10-20% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी तर अ जीवनसत्व टिकण्याचे प्रमाण 5-10% अधिक असते. >> सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते. >> सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळे, आपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता. >> सौरचूल वापरून आपण भाजणे, शिजवणे इ. सारख्या सर्व आवश्यक गोष्टी करू शकता. तोटे >> पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. >> अन्न शिजवण्याच्या...